orchid hospital jalgaon
orchid hospital jalgaon
जळगाव

जळगाव : ऑर्किड हॉस्पिटलमध्ये टेस्टच्या नावाखाली लूट

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon

ऑर्किड येथे नॉन कोविड पेशंट जे महात्मा फुले जन स्वास्थ्य योजने अंतर्गत येणार्‍या गरीब व गरजू लोकांना लाभ मिळतो. मात्र, हे पेशंट हॉस्पिटलमध्येे वेगवेगळ्या आजारासाठी भरती होतात. त्यांच्याकडून सुरवातीला 1400 रुपये वसूल केले जातात.

गेंदालाल मिल येथील नॉन कोविड पेशंट ज्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असताना ही 1400 रुपये घेतलेत. तसेच देवगिरी तालुका चोपडा येथील आदिवासी पेशंट याच्याकडून ही 1400 रुपये वसूल केले गेलेत. तिथे विचारले असता सर्व पेशंटकडून आधी 1400 रुपये घेतले जातात व मग त्याला अ‍ॅडमिट केले जाते.

शासनाने जर सर्व आजारांसाठी ही महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली असताना हे जास्तीचे पैसे का वसूल केले जातात, अशी तक्रार लोक संघर्ष मोर्चाने जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

हे पैसे घेणे तात्काळ थांबवून गरजू व गरीब पेशंटला न्याय द्यावा ही अपेक्षा प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे, प्रमोद पाटील, विशाल नाथानी, भरत कर्डिले आदींनी जिल्हाधिकार्‍यांना एका निवेदनाव्दारे केली आहे. टेस्टच्या नावाखाली होणारी लूट न थांबविल्यास ऑर्किड हॉस्पिटल विरोधात आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही लोक संघर्ष मोर्चाने एका निवेदनाव्दारे दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com