बळीराम पेठ, महाबळ येथील चार दुकाने सील

प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे पालन न केल्याने महापालिकेतर्फे कारवाई
बळीराम पेठ, महाबळ येथील चार दुकाने सील

जळगाव - Jalgaon :

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रशासनाकडून दुकानांसाठी वेळेशी मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. ठरवुन दिलेल्या मर्यादित वेळेपेक्षाही जास्त वेळ दुकाने सुरु ठेवुन व्यवसाय करणार्‍या बळीराम पेठेतील तीन व महाबळ येथील एक अशा चार दुकानांवर आज गुरुवारी महापालिकेतर्फे सीलची कारवाई करण्यात आली आहे

जिल्ह्यासह जळगाव शहरात कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध घोषित करण्यात आले आहे. यात दुकानांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यत याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.

असे असतानाही मर्यादित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने सुरू ठेवुन काही व्यावसायिक व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसुन येत होते. या पाश्र्वभूमीवर आज गुरुवारी महापालिकेच्या पथकाने शहरात पाहणी केली असता बळीरामपेठ सह महाबळ परिसरात प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू असल्याचे दिसून आले.

अशा चार दुकानांवर पथकाने सीलची कारवाई केली. यात बळीरामपेठेतील श्री संत गोदडीवाला गारमेंट, हितेश होजिअरी, राधा होजिअरी तर महाबळ त्र्यंबकनगर येथील विनोद इलेक्ट्रिकल्स व हार्डवेअर या दुकानांचा समावेश आहे. महापालिका उपायुक्त संतोष वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ठाकूर, नितीन भालेराव, नाना कोळी, किशोर सोनवणे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com