निर्बंधात सुरु असलेले दहा दुकाने सील

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांची कारवाई
निर्बंधात सुरु असलेले दहा दुकाने सील

जळगाव - Jalgaon :

करोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यासह राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहे. निर्बंध असतांनाही नियमबाह्य व्यवसाय करणार्‍या दहा दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली. ही कारवाई मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी केली आहे.

जळगाव शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातच नव्हेतर राज्यभरात ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांना बंदचे आदेश आहेत. मात्र जळगाव शहरात अर्धे शटर पाडून लपून-छपून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

दरम्यान, मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण निर्मुलन विभागाचे संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, किशोर सोनवणे, यांच्या पथकाने बळीरामपेठ, कोंबडी बाजार चौक, फुले मार्केट, सुभाष चौक या परिसरात पाहणी केली. दरम्यान, साई प्लाझा मधील सात दुकानांवर, बळीरामपेठेत दोन दुकानांवर तर कोंबडी बाजार चौकात एक अशा दहा दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली.

या दुकानांवर करण्यात आली कारवाई


बळीरामपेठेतील साई प्लाझामधील निनावी दुकान, शिवांश स्पोर्टस्, एबीसी होलसेल मार्टमधील चार दुकाने, जिन्या खालील एक दुकान, बळीरामपेठेतील अनमोल स्टील, पूजा फुटवेअर तर कोंबडी बाजार चौकातील स्टार स्टील कुलर्स या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com