एसटी वर्कशॉपजवळील तीन दुकाने सील

अतिक्रमणाचीही कारवाई
एसटी वर्कशॉपजवळील तीन दुकाने सील

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदी लागू केल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा आहे. मात्र काही व्यावसायिक लपुन-छपून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एसटी वर्कशॉपजवळील तीन दुकाने सील केली आहे. ही कारवाई मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी केली आहे.

तसेच सुभाष चौक आणि का.ऊ. कोल्हे शाळेजवळ भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदचे आदेश आहेत.

असे असतांनाही एसटी वर्कशॉपजवळ तीन दुकाने सुरु असल्याचे लक्षात आल्याने या दुकानांवर सील करण्याची कारवाई करण्यात आली.

तसेच अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली असून, सात ते आठ हातगाड्या आणि विक्रेत्यांकडील माल जप्त करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com