जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मू.जे. महाविद्यालय परिसरात दुकानदारांनी तब्बल 20 ते 25 फुटांचे शेड उभारुन अतिक्रमण केले होते.

स्वतःहून शेड काढण्याबाबत संबंधीत दुकानदारांना आठ दिवसांपुर्वी सूचित केले होते. मात्र स्वतःहून न काढल्याने आज उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जेसीबीव्दारे जवळपास 20 ते 25 दुकानांसमोरील शेड हटविले. दरम्यान, कारवाईला विरोध करणार्या तीन जणांविरुध्द रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मू.जे. महाविद्यालय परिसरात अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करतांना तीन दुकानदारांनी कारवाईला विरोध करत महानगरपालिकेच्या कर्मचार्यांशी वाद घातला.

त्यामुळे संजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गौरव लवंगळे, तर ज्ञानेश्वर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल मेघानी, नारायण मेघानी यांच्याविरुध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनापरवानगी फलक काढले

ओंकारेश्वर मंदिर परिसरात काही खासगी क्लासेसचे विनापरवानगी लावलेले फलक दिसून आले.

दरम्यान, महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई करत 25 ते 30 फलक काढले. विनापरवानगी फलक लावणार्यांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.

दाणाबाजारातून तीन पिकअप व्हॅन जप्त

दाणाबाजारात वाहतूकीला अडथळा ठरत असल्यामुळे मालवाहू वाहनांना केवळ 10 च्या पुर्वी आणि सायंकाळी 5 नंतर परवानगी आहे.

तीन दिवसांपुर्वी दोन मालवाहू ट्रक जप्त केले होते. आज पुन्हा तीन पीकअप व्हॅन जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.