जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मनपा अतिक्रमण विभागाने गुरूवारी फुले मार्केटमधून 3 तर रेल्वे स्टेशन परिसरातून 1 दुकान सील केले यासह 2 हातगाड्या, 2 टू व्हिलरसह जवळपास 25 ते 30 हॉकर्स, विक्रेत्यांचा माल व साहित्य जप्त करण्याची मोठी कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मनपा अतिक्रमण विभागाने साडेअकराच्या दरम्यान फुले मार्केट, जुना कापड बाजार, काँग्रेस भवन परिसरात मोठी कारवाई करीत 3 दुकाने सील केली.

या दुकानदारांनी इतर हॉकर्स बांधवांचा माल आपल्या दुकानात ठेवला होता. यावरुनच ही कारवाई या दुकानदारांवर करण्यात आली आहे. असे साहित्य ठेवणे हे अनधिकृत आहे.

तसेच फुले मार्केटसह काँग्रेस भवन व वैभव कापड दुकानाजवळ असे जवळपास 25 ते 30 हॉकर्संचा माल व साहित्य जप्त करण्यात आले.

यात रस्त्यावर बसणार्या हॉकर्सं बांधवांचाही समावेश आहे. या साहित्यात चपला बूट, कॉस्मेटीक, प्लास्टिक वस्तू, कपडे, सौंदर्य प्रसाधने आदी साहित्यांचा समावेश आहे. गेल्या आठ दिवसातली ही मोठी कारवाई असल्याचे अधिकार्यांकडून समजले.

शहरातील फुले मार्केटसह घाणेकर चौक, फ्रुट गल्ली, जुना कापड बाजार परिसर आदी परिसरात रस्त्यावरील हॉकर्सना अन्य एका पथकाने हटकले.

तसेच वारंवार रस्त्तावर जागा व्यापून वस्तू विक्री करणार्यांना उपायुक्त वाहुळे यांनी समज दिली. तिसर्यांदा आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असेही काही दुकानदारांना यावेळी बजावण्यात आले.

रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरातही अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा वळवत या परिसरातही 1 दुकान सील करण्यात आले. तर अन्य एक दुकानदारास तंबी देण्यात आली. येथेही इतर साहित्य ठेवल्याचे आढळून आले.

तसेच फ्रूट विक्रेत्या दोन जणांच्या हातगाड्याही जप्त करण्यात आल्या. वाहतुकीस रस्त्यावर मोठी अडचण या हॉकर्स बांधवांमुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

तसेच कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही, राज्यासह शहरात अजूनही कोरोनाचे सावट आहेच. त्यासाठी खबरदारीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करणे आवश्यक आहे तसेच सावधानी बाळगणे अद्यापही प्रत्येकाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. अतिक्रमण कारवाई ही यापुढे शहराच्या प्रत्येक भागात सुरू राहील असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले.