जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शनिवारी भर बाजाराचा दिवस असतांना फुले मार्केटमध्ये 2.30 ते 3.00 वाजेच्या सुमारास मनपा अतिक्रमण विभागाचे ट्रॅक्टर वाहन आले असतांना फुले मार्केटमध्ये एकच धावपळ उडाली.

जो तो आपले कपडे व इतर साहित्य विक्रीची गाठोडे बांधत इतरत्र पळू लागल्याचे चित्र दिसत होते. यात कुणाचे कपडे विकले गेले अन पैसे घेतले नाही, तर काहींचे पैसे दिले गेले पण बाकी राहिलेले पैसे घेणे बाकी राहून गेल्याचे प्रत्यक्ष चित्र दिसून आले.

अतिक्रमण विभागाचे ट्रॅक्टर हे काँग्रेस भवनाच्या गेटकडून आत येत असतांना मार्केटमधील हॉकर्स हे मिळेल त्या दिशेने गल्ली बोळाकडे आपले गाठोडे घेवून पळत होते.

त्यातच उपायुक्त वाहुळे हे स्वत: ही येत असल्याच्या अफवेने एकच गोंधळ उडाला. याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पाणी केली असता नेहमीप्रमाणेची रुटींगचा भाग म्हणून मनपा अतिक्रमण विभागाची टीम आपल्या ट्रॅक्टर वाहनासह दुपारी फुले मार्केटमध्ये दाखल झाले होते.

त्यांना पाहताच काही हॉकर्स, दुकानदार हे आपले गाठोडे गुंडाळून पळतांना दिसत होते आणि स्वत: उपायुक्त हे या मार्केटमध्ये आलेच नसल्याचे दिसले. मात्र भर मार्केटमध्ये ही अफवा पसरल्याने दुकानदार, हॉकसर्र्सह खरेदी करणार्यांचीही एकच धांदल उडाली.

सुभाष चौक, बळीरामपेठेत हटकले

अतिक्रमण विभागाची दुसरी टीम ही बळीराम पेठेत भरणार्या बाजारात आपल्या वाहनासह दाखल होताच भाजीपाला विक्रेते हॉकर्स हे आपल्या हातगाड्या घेवून मिळेल त्या गल्लीबोळाकडे जातांना दिसत होते. एकच धावपळ तिकडेही सुरुवातीला काही वेळ झाली नंतर मात्र काही वेळा नंतर जैसे थे स्थिती झाली आणि हॉकर्स, भाजीपाला विक्रेते पुन्हा आपापल्या जागेवर येतांना दिसून येत होते. मुख्य रस्त्यांवरील भाजी विक्रेते, हातगाडीधारक यांना मात्र रस्त्यावरुन बाजुला हटकण्यात आले.

प्रत्यक्ष कारवाई किरकोळ

नेहमीप्रमाणेच अतिक्रमण विभागाने काही हॉकर्सना येेथे हटकले. तास, अर्धातास फुले मार्केट परिसरात हॉकर्सधारक हे त्या जागेवर बसलेच नाही, अतिक्रमण विभागाची टीम काही वेळ इतरत्र फिरकली तोपयर्र्त कुणी हॉकर्स परत त्या जागेवर बसला नाही. मात्र त्याच मार्केंटमध्ये दुसरीकडे मात्र काही हॉकर्स आपला व्यवसाय बिनधास्तपणे करतांना दिसत होते.

पुढे पाठ, मागे सरसपाट...

नेहमीप्रमाणेच अतिक्रमण विभागाचे पथक फुले मार्केटसह फ्रूट गल्ली, सुभाष चौक, चौबे शाळा परिसरात दाखल होते. काही वेळ शांतता होते. नंतर हे अतिक्रमण पथक दुसर्या ठिकाणी वळल्यानंतर पुन्हा हॉकर्स, हातगाडीधारक आपापली जागा घेतात व पुन्हा व्यवसाय सुरू करतात. नित्याचाच हा प्रकार झाला आहे, असे या प्रकारावरुन दिसून आले. मात्र अतिक्रमण विभागाने आपले कर्तव्य हे नेहमी पार पाडलेच पाहिजे. तरच हॉकर्स, हातगाडीधारकांवर जरब बसेल. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई ही आवश्यक असल्याचेही सामान्य नागरिकांमध्ये बोलले जात आहे.