न्याय द्या, अथवा आत्महत्त्येची परवागनी द्या.!

ना. एकनाथराव शिंदे यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर गाळेधारकांचे निदर्शने
न्याय द्या, अथवा आत्महत्त्येची परवागनी द्या.!

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे हे जिल्हा दौर्‍यावर आले असता, ते महापालिकेत आढावा बैठक घेणार होते. त्यासाठी जवळपास 300 ते 350 गाळेधारक महापालिकेसमोर आपली व्यथा मांडण्यासाठी आले होते.

मात्र, दौर्‍यात अचानक बदल झाल्याने ते दुपारी 1 वाजता महापालिकेत न येता, थेट पाचोरा येथे रवाना झाले. त्यामुळे संतप्त गाळेधारकांनी मानवी साखळी तयार करुन निदर्शने केली. गाळेधारकांना एकतर न्याय द्या. नाहीतर आत्महत्त्येची परवानगी द्या. अशी मागणी करत गाळेधारकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

महापालिकेबाहेर मानवी साकळी बनविलेल्या गाळेधारकांनी गाळेधारकांना न्याय द्या. गाळेधारकांना आत्महत्येची परवानगी द्या आदी मागण्या असलेले आपल्या हातात फलक घेतले होते. वेळोवेळी गाळेधारक भाडे भरण्यास तयार असून ते रीतसर करण्यात यावेत. गाळे लिलावाचा ठराव करण्यात आला आहे तो आता रद्द करण्यात यावा. यापूर्वी झालेल्या दोन बैठकीत महापालिकेत आम्ही वारंवार दाद मागून देखील न्याय मिळत नसल्याने नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी हे गाळेधारक करत होते.

गाळेधारक मनपा प्रशासकीय इमारती बाहेर ना. शिंदे यांची भेट घेण्यासाठी थांबले होते, मात्र, ना. शिंदे हे महापालिकेत न येत पाचोरा येथे गेल्याने या गाळेधारकांचा हिरमोड झाला. आणि त्यानंतर संतप्त गाळेधारकांनी मानवी साखळीव्दारे निदर्शने केली.

गाळेधारक संघटनेतर्फे ना. शिंदे यांना निवेदन

नगरविकास मंत्री शनिवारी जिल्हा दौर्‍यावर होते. विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी भेट देवून सोनवणे कुटूंबियांचे सांत्वन केले. त्याच ठिकाणी मनपा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, राजेश कोतवाल, बंडूदादा काळे, तेजस देपूरा उपस्थित होते. यावेळी त्यांनी ना. शिंदे यांना निवेदन देवून गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. यावर ना. शिंदे यांनी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांना मुंबईत चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले असून, गाळ्यांचा प्रश्न निकाली काढण्याबाबत आश्वासनदेखील दिले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com