जळगाव मनपाच्या चेतनदास रुग्णालयात तोडफोड

लसीकरणासाठी पहाटेपासून रांगेत असलेल्या नागरिकांचा संताप
जळगाव मनपाच्या चेतनदास रुग्णालयात तोडफोड

जळगाव - Jalgaon :

मनपाच्या सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता रुग्णालयात आज ९० लसींचा पुरवठा करण्यात आला.

मात्र याठिकाणी केवळ ६९ जणांचे लसीकरण झाल्यानंतर लस संपल्याचे नागरिकांना सांगण्यात आले.

यामुळे पहाटेपासून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी गोंधळ घातल संतापाच्या भरात रुग्णालयाचे गेट तोडत माहिती फलक फाडल्याचा प्रकार आज सकाळी घडला.

दरम्यान घटनास्थळी महापौर, उपमहापौरांनी धाव घेतल्यानंतर हा वाद शांत झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com