चाळीसगावचा मक्तेदार काळ्या यादीत

पाच महिने उलटूनही काम न केल्याने मनपाची कारवाई
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मनपा प्रशासनाने डांबरी रस्ते आणि दुरुस्तीसाठी चाळीसगाव येथील मक्तेदाराला मक्ता दिला होता. पाच महिने उलटूनही काम सुरु न केल्याने कार्यादेश रद्द करण्यात आले आहे.

तसेच पाच वर्षांकरीता काळ्या यादीत टाकण्याचे आदेश मनपाचे शहर अभियंता अरविंद भोसले यांनी दिले आहे.

महापालिकेच्या निधीअंतर्गत डांबरी रस्ते दुरुस्ती करण्यासाठी चाळीसगाव येथील मक्तेदार पी.एस. कुुमावत यांना मक्ता दिला होता. त्यानुसार कार्यादेश देखील देण्यात आले होते.

कार्यादेश दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत काम करणे अपेक्षित होते. मात्र पाच महिने उलटूनही कामाला सुरुवात केली गेली नाही.

मान्सुनपुर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे होणे अपेक्षित असल्यामुळे मक्तेदाराला वारंवार सूचना दिल्या होत्या.

नोटीसदेखील बजावण्यात आली होती. तरीदेखील काम न सुरु केल्याने चाळीसगाव येथील मक्तेदाराला दिलेले कार्यादेश रद्द करण्यात आले आहे.

तसेच पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले असून, मक्तेदाराने निविदेसाठी भरलेली इसारा रक्कमदेखील जप्त केली आहे. याबाबतचे आदेश शहर अभियंता यांनी काढले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com