अतिक्रमण कारवाईसाठी सहा अधिकार्‍यांची नियुक्ती

अतिक्रमण कारवाईसाठी सहा अधिकार्‍यांची नियुक्ती

जिल्हाधिकारी राऊत यांचे आदेश

जळगाव - Jalgaon :

शहरात भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यासाठी तसेच अतिक्रमण पथकास सहकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहा अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.

यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय निकुंभ, शाखा अभियंता गिरीष सूर्यवंशी, अभिषेक सूर्यवंशी, अमित राजपूत, जितेंद्र चव्हाण, सौरभ तिवारी यांचा समावेश आहे.

संबंधीत अधिकार्‍यांनी १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता महानगरपालिकेत रुजू व्हावे आणि अतिक्रमण धारकांवर नियमानुसार कारवाई करावी. असेही आदेशात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com