खराब रस्त्यांमुळे केली अधिकार्‍यांची आरती

नगरसेवक पाठपुरावा करीत नसल्याचा नागरिकांचा आरोप
खराब रस्त्यांमुळे केली अधिकार्‍यांची आरती

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

अमृतच्या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यासह परिसरातील समस्या मांडण्यासाठी नगरसेवकासह अमृतच्या अधिकार्‍यांना बोलावित त्यांचे औक्षण करुन आरती उतरविल्याचा प्रकार शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये घडला. त्यामुळे दिवसभर या प्रकाराबाबत मनपासह नगरसेवकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरु आहे. त्यामुळे शहरातील गल्लीबोळासह मुख्य रस्ते देखील खोदण्यात आले आहे. शहरातील सर्वच भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने अपघातासह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे नागरिकांध्ये संतापाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. रस्त्याची झालेली दुरावस्थेसह परिसरातील समस्यांबाबत प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकासह अमृत योजनेच्या अधिकार्‍यांना बोलविले होते.

दरम्यान अधिकारी प्रभाग क्रमांक 16 मध्ये दाखल होताच परिसरातील नागरिकानी त्यांच्यावर प्रश्नांचा भाडीमार करीत त्यांचे औक्षण करीत आरती उतरविली. अचानक झालेल्या प्रकारामुळे अधिकारी देखील अचंबीत झाल्याने या प्रकाराबद्दल महापालिकेसह नगरसेवकांमध्येयाच विषयाची दिवसभर चर्चा सुरु होती.

शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून नगरसेवकांडून या कामासाठी पाठपुरवाच केला जात नसल्याचा आरोप प्रभाग 16 मधील नागरिकांनी केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com