मनपाचा पुन्हा आकृतीबंध

महासभेच्या मंजुरीनंतर पाठविणार शासनाकडे;अनेक जागा रिक्त
मनपाचा पुन्हा आकृतीबंध
Jalgaon Municipal Corporation

जळगाव - Jalgaon :

जळगाव महानगरपालिकेतील रिक्त जागांबाबत २०१९ मध्ये आकृतीबंध तयार करण्यात आला होता. प्रशासनाने शासनाकडे पाठविल्यानंतरही दखल घेतली गेली नाही.

त्यामुळे पुन्हा आकृतीबंधचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या आहेत.दरम्यान,आकृतीबंधचा प्रस्ताव तयार झाल्यानंतर महासभेची मंजुरी घेतल्यानंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.


तत्कालीन जळगाव नगरपालिकेनंतर २००३ मध्ये मनपा अस्तित्वात आली.१९९७ मध्ये तत्कालीन जळगाव नपाने आकृतीबंध तयार केल्यानंतर १३२० पदांना मंजुरी मिळाली होती.परंतु सफाई कर्मचार्‍यांच्या ५५० जागा व्यपगत झाल्या होत्या.

त्यामुळे उर्वरित ७७० रोजंदारी कर्मचार्‍यांना कायम करण्यात आले होते.तसेच उड्डाण पदोन्नती देण्यात आल्या होत्या.

तब्बल२१ वर्षानंतर २०१७ मध्ये २६५६ जागांसाठी नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला होता.दोन वेळा शासनाकडे पाठवून देखील दखल घेतली गेली नाही.

सद्यस्थितीला मनपातील अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. परिणामी कर्मचार्‍यांच्यावर कामाचा ताण पडू लागला आहे.रिक्त जागा भरण्यासाठी पुन्हा आकृतीबंधचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शुक्रवारी बैठक घेवून आस्थापना अधिक्षकांना दिल्या आहेत.

आकृतीबंधचा दोन वेळा प्रस्ताव पाठवूनही शासनाचे दुर्लक्ष

मनपाने २०१७ मध्ये २६५६ जागांसाठी आकृतीबंधचा प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठविला होता.अक नव्हे तर दोनदा पाठवूनही जळगाव मनपाच्या आकृतीबंधच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले.मनपात आता शिवसेनेची सत्ता आहे.राज्यातही ठाकरे सरकार आहे.त्यामुळे आता तयार करण्यात येणारा आकृतीबंधचा प्रस्ताव मंजूर होईल.अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.

विभागनिहाय रिक्त जागांची मागविली माहिती

मनपा प्रशासनाकडून नवीन आकृतीबंध तयार करण्यात येणार असून सर्व विभाग प्रमुखांकडून रिक्त जागांची माहिती मागविली आहे.संबंधित माहिती प्राप्त झाल्यानंतर आवश्यक रिक्त जागांचा प्रस्ताव तयार करुन महासभेची मंजुरी घेतली जाणार आहे.त्यानंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.त्याअनुषंगाने आयुक्त कुलकर्णी यांनी विभाग प्रमुखांना सूचना दिल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com