भजी विक्रीचे 90 रुपये आयुक्तांना मनीऑर्डर

गाळेधारकांचे कलेक्टोरेटसमोर अनोखे आंदोलन
भजी विक्रीचे 90 रुपये आयुक्तांना मनीऑर्डर

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील मुदत संपलेल्या 16 मार्केटमधील च्यागाळेधारकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण केले जात आहे. उपोषणाच्या आठव्या दिवशी गाळेधारकांनी जिल्हाधिकारी कार्यासमारे भजी विक्री करीत जमा झालेली 90 रुपयांची रक्कम मनपाचे आयुक्त सतिश कुलकर्णी यांना मनीऑर्डर करणार असल्याची माहिती संघटनेचे तेजस देपुरा यांनी दिली.

मुदत संपलेल्या गाळेधारक संघटनेकडून गेल्या आठ दिवसांपासून दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली जात आहे. आज गाळेधारकांनी भजे तळून त्याची विक्री करून अनोखे आंदोलन केले.

ज्या गाळेधारकांच्या घामाच्या पैशावर जळगावमध्ये मनपाची व्यापारी संकुले उभी राहीली, मनपाला अब्जावधींची प्रॉपर्टी मिळाली. जळगाव मनपाने गाळेधारकांना संपविण्याची सुपारी घेतली असल्याचा आरोप गाळेधारकांनी केला.

सकाळी उपोषणाला धर्मशाळा मार्केटचे रमेश तलरेजा, प्रकाश गागनानी, सुभाष तलरेजा, प्रशांत पगारीया, जगदीश दासवाणी उपस्थित होते तर दुपारी सुरज हेमनानी, संदीप वालेचा, अनुप अडरेजा, रमेश माधवाणी, सुनील रोकडे यांच्यासह डॉ.शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, पंकज मोमाया, रिजवान जहाँगीरदार, आशिष सपकाळे, सुरेश पाटील, विलास सांगोरे उपस्थित होते. उपस्थित होते.

आज ‘किडनी बेचो’ आंदोलन

गाळेधारकांनी पुकारलेल्या उपोषणात उद्या 23 जून रोजी उपोषणस्थळी आंबेडकर मार्केटमधील गाळेधारक किडनी बेचो आंदोलन करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com