गाळेधारकांच्या अर्धनग्न आंदोलनाने वेधले लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह उपायुक्तांनी घेतली भेट
गाळेधारकांच्या अर्धनग्न आंदोलनाने वेधले लक्ष

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील अविकसित व अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारक अन्न , वस्त्र व निवार्‍याला मुकण्याची वेळ आलेली आहे. पंचवीस हजार नागरिकांना देशोधडीला लावू पाहणारी ही महानगरपालिका आहे. त्यामुळे आज अर्धनग्न आंदोलन करून मनपाच्या जुलमी कारवाईचा गाळेधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणात विरोध केला.

अर्धनग्न आंदोलनासाठी भास्कर मार्केट मधील गाळेधारक सकाळी 9 ते 1 रिजवान जहागीरदार, सदाशिव सोनवणे, भास्कर वाघोदे, शिवराम कोळी, शालिग्राम सोनार दुपारी मधुकर सिद्धपुरे, लक्ष्मण सांगोरे, इम्रान खाटीक, रवींद्र लोहार, संजय सोनगिरे यांनी अर्धनग्न आंदोलनात सहभाग नोंदविला.

महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी सुद्धा उपोषणस्थळी भेट देऊन संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्यासोबत चर्चा केली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे चे पुरुषोत्तम टावरी यांनी आपला पाठिंबा साखळी उपोषणला जाहीर केला.यावेळी पांडुरंग काळे, युवराज वाघ, तेजस देपुरा, सुजित किनगे, आशिष सपकाळे, पंकज मोमाया, सुरेश पाटील, संजय बोरसे उपस्थित होते.

राष्ट्रवादीसह अनेक संघटनांचा पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीषदा जैन, वरिष्ठ उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, महिला महानगर अध्यक्ष मंगलाताई पाटील ,अशोक पाटील, लिलाधर तायडे,अशोक लाडवंजारी , सुनील माळी, शितल साळी, योगेश देसले, अनिरुद्ध जाधव, अनिल पवार,साहिल पटेल यांनी बेमुदत साखळी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

भाजपाचे गटनेते भगत बालाणी यांनीसुद्धा अर्धनग्न आंदोलनात शर्ट काढून सहभाग नोंदविला.ओबीसी समता परिषदेचे पदाधिकारी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नगरसेविका सरिता नेरकर, संतोष इंगळे, अमर महाजन आरती शिंपी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

गाळेधारक करणार थाळीनाद आंदोलन

मनपा प्रशासनाच्या कारवाईविरोधात मनपा गाळेधारक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. उद्या दि. 18 रोजी साळखी उपोषणस्थही भोईटे मार्केटचे गाळेधारक थाळीनाद आंदोलन करणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com