ठेकेदार वॉटरग्रेस अन् महापालिकेचा सावळा गोंधळ उघड

ठेकेदार वॉटरग्रेस अन् महापालिकेचा सावळा गोंधळ उघड
Jalgaon Municipal Corporation

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहराच्या स्वच्छतेचा ठेका असलेली वॉटरग्रेस कंपनी व मनपाच्या करारात वाहनांच्या रिपेअरचा खर्च वॉटरग्रेस कंपनीने करावा असे ठरलेले असतांना तो खर्च जळगाव महानगरपालिका का उचलत आहे, यासह इतर प्रश्न राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आज शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी उपस्थित केले.

अभिषेक पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, वॉटरग्रेस कंपनीला या आधीच आपल्या कंगाल मनपा ने मोठ्या उदार मनाचे होऊन वाहने विकत घेऊन दिलेले असताना त्यावर किरकोळ किंवा मोठ्या नुकसान किंवा रिपेअरचा खर्च हा वॉटरग्रेसने करावा

हे त्याच्या झालेल्या कारारनाम्यात स्पष्ट पणे मुद्दा क्र इ नमूद असताना देखील या चा खर्च मनपा का करत असेल ? दि 4 मे 2021 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत संविदेत मुद्दा क्र 8 मध्ये सदरील वाहनांच्या लोखंडी कप्पे सुधारण्यासाठी 13 हजार 900 रु प्रमाणे 85 गाड्याच्या दुरुस्तीसाठी 11 लाख 81 हजार 500 रु चा खर्चास मंजुरी देऊन सदरील काम पूर्ण करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com