मनपा समोर गाळेधारकांचे आंदोलन

गाळ्यांच्या ठरावाला विरोध
मनपा समोर गाळेधारकांचे आंदोलन

जळगाव - Jalgaon :

मनपा मालकिच्या मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत महासभेत धोरणात्मक निर्णयाविरोधात गाळेधारकांनी महानगरपालिकेसमोर कुटूंबियांसह आंदोलन केले.

यावेळी पंकज मोमाया, रिझवान जहॉंगिरदार, आशिष सपकाळे, हेमंत परदेशी, शिरीष थोरात, संतोष अत्तरदे, अशपाक अन्सारी, दिलीप साळुंखे, वसंत भावसार, बापू कोल्हे, अमोल वाणी, किशोर सोनवणे, गोपाल बजाज, कमल तलरेजा, दिनेश वालेचा, शंकर वदवानी, मिनाक्षी सपकाळे, सलोनी परदेशी आदी गाळेधारक उपस्थित होते.

मनपा प्रशासनाने शासन जोपर्यंत निर्णय घेणार नाही. तोपर्यंत मनपा प्रशासनाने निर्णय घेवू नये. तसेच जे १६ अविकसीत, अव्यावसायिक मार्केट आहेत. त्या मार्केटमध्ये अडीच ते तीन टक्के भाडे आकारणी करावी. पाचपट दंड रद्द करावा. अशी मागणी जळगाव शहर मनपा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com