चक्क...पहाटेपासूनच लपून-छपून व्यवसाय

चक्क...पहाटेपासूनच लपून-छपून व्यवसाय

18 दुकाने सील; मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांची कारवाई

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या पार्श्वभूमिवर कडक निर्बंध लागू असतांनाही शहरात सर्रापणे लपून-छपून व्यवसाय सुरु असल्याचे दिसून येत आहे.

काही व्यावसायिक पहाटे चार वाजेपासूनच व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारीही मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी पाहणी केली असता, तब्बल 18 दुकानांवर सीलची कारवाई केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 मे पर्यंत राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. नियमांचे पालन करण्यासंदर्भात वारंवार सूचना दिल्या जात आहे. परंतू, काही व्यावसायिक शटर बंद करुन आतमध्ये व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधीत दुकानांवर सीलची कारवाई करण्यात येत आहे. कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाईल.

संतोष वाहुळे, उपायुक्त, मनपा

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अत्यावश्यक सेवा वगळता जीवनावश्यक वस्तुंसाठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

या व्यतिरीक्त व्यावसायिकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही, पहाटेपासूनच लपून-छपून व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवारी पहाटेपासूनच उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने महात्मा गाधी मार्केट, बळीरामपेठ, फुले मार्केट, न्यु. बि.जे.मार्केट या परिसरात पाहणी केली. दरम्यान, सलुन, रेडिमेड कपड्यांची दुकाने, इलेक्ट्रीकल साहित्याची दुकाने शटर पाडून आतमध्ये व्यवसाय करीत असल्याचे लक्षात आल्याने तब्बल 18 दुकानांवर कारवाईची बडगा उगारुन दुकाने सील करण्यात आली आहेत.

या दुकानांवर कारवाई

निर्बंध असतांनाही व्यवसाय करणार्‍या 18 दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. यात फुले मार्केटमधील विशाल युनिफॉर्म, जगदिश होजिअरी, मेट्रो ड्रेसेस, राधिका ड्रेसेस, न्यु.बि.जे. मार्केटमधील श्रीराज अ‍ॅटो, सॅमोरिया इलेक्ट्रीकल्स्, महाराष्ट्र पेंट हाऊस, वेद प्रिंटर्स, ऑफसेट, शाह इंजिनिअरींग वर्क्स्, सुनील पाटील, कोंबडी बाजार चौकातील राजस्थान वेल्डिंग वर्क्स्, शाहूनगर हौसिंग सोसायटीतील दीपक प्लाय अँड किचन, निसरा प्रहार प्रेस, बोहरा गल्लीतील अंनत हेअर आटर्स्, टॉवर चौकातील दौलत प्लाझा आकाश शुज सेंटर, बळीराम पेठेतील पुष्पा कलेक्शन, महात्मा गांधी मार्केटमधील ओम साई मेन्स वेअर तसेच नॅशनल प्लास्टिक स्टोअर्स या दुकानांचा कारवाईत समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com