पोलनपेठ, दाणाबाजारातील 8 दुकाने सील

महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांची कारवाई
पोलनपेठ, दाणाबाजारातील 8 दुकाने सील
Jalgaon Municipal Corporation

जळगाव - Jalgaon :

शहरातील पोलनपेठ तसेच दाणाबाजारात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज बुधवारी 8 दुकानदारांवर मनपा प्रशासनातर्फे सीलची कारवाई करण्यात आली. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता दाणा बाजारात मोठमोठ्या धान्य दुकानांमध्ये सकाळी गर्दी होत असते.

त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढू शकतो म्हणून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी या दुकानांचे चित्रिकरण करुन मनपाच्या पथकाला कळविले.

त्यानुसार त्यानुसार उपायुक्त संतोष वाहुळे यांनी कर्मचार्यांसह शहरातील पोलन पेठेतील गृहसंसार प्रोव्हिजन, बाबा हरदास ट्रेडर्स, दाणा बाजारमधील मे विजयकुमार रामदास, सुभाष चौक, पोलन पेठेतील मे बिरदिचंद धनराज बरडिया, कीर्ती ट्रेडर्स, बोहरा मस्जिद कॉम्प्लेक्समधील महाराष्ट्र टूल्स आणि हार्डवेअर, पोलन पेठेतील अमृतकर किराणा आणि अनिल ट्रेडिंग कंपनी या दुकानांवर सीलबंदची कारवाई केली.

फुले मार्केटला चहुबाजूने पत्रे ठोकून बंद करण्यात आले आहे. मात्र, तरीसुद्धा अनेक हॉकर्स मार्केटमध्ये प्रवेश करुन कपड्यासह अन्य साहित्याची विक्री करीत होते. ही बाब लक्षात येताच या दुकानदारांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करुन हॉकर्सचे सर्व साहित्य जप्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com