नमकीन विक्रेत्याला मारहाण करणार्‍या दोघांना अटक

नमकीन विक्रेत्याला मारहाण करणार्‍या दोघांना अटक

एमआयडीसी पोलिसांची कारवाई, १०० रुपयांचा नाश्ता मागितला होता फुकट

जळगाव - Jalgaon

फुकटचा नाश्ता न दिल्याने सिंधी कॉलनी (Sindhi Colony) येथे मिठाई व नमकीन विक्रेत्या तरुणाला मारहाण करणार्‍या उमेश उर्फ मायकल कन्हैया नेतलेकर वय २३ रा. कंजरवाडा, जळगाव व आकाश नंदू लोहाळेकर वय २२ रा. नाथवाडा, जळगाव या दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) अटक केली आहे त्यांना गुरुवारी रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सिंधी कॉलनी येथे सेवा मंडळासमोर बबलाराम नारायणदास तलरेजा वय ४६ यांचे मिठाई व नमकीन विक्रीसह नाश्त्याचे दुकान आहे. सोामवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दुकानावर उमेश उर्फ मायकेल व आकश लोहाळेकर हे दोघे आले.

१०० रुपयांचा फुकटात नाश्ता दिला नाही या कारणावरुन दोघांनी बबलाराम तलरेजा यास शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली यादरम्यान मायकेल याने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने बबलाराम यांच्या डोक्यावर मारहाण करुन दुखापत केली. याप्रकरणी बबलाराम तलरेजा यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात मायकेलसह गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी आनंदसिंग पाटील,रमेश चौधरी, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे व योगेश बारी यांनी बुधवारी रात्री संशयित उमेश व आकाश या दोघांना अटक केली. दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्या.ए.एस.शेख यांनी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ऍड.स्वाती निकम यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com