जळगाव : जिल्हाधिकारी आपल्या दारी
जळगाव

जळगाव : जिल्हाधिकारी आपल्या दारी

करोना संशयित रूग्ण शोध मोहिमेची पाहणी

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

जळगाव शहरात दिवसागणीक करोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व मनापा प्रशासनाने सात दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने सध्या मनपा क्षेत्रात लॉकडाऊन सुरू आहे.

या काळात आरोग्या विभागासह सामाजिक संस्थांच्या मदतीने घरोघरी जावून आरोग्य तपासणी केली जात आहे, जेणेकरून त्यांचेवर योग्य वेळी उपचार करता येतील. अशाच एका सामाजीक संस्थेच्या पथकाद्वारे नागरीकांची आरोग्य तपासणी करत असताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष नागरीकांच्या दारात उभे राहून पाहणी केली.

शहरात सुरू असलेल्या आरोग्य तपासणीस व लॉकडाऊनला नागरीकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सध्या करोना बाधितांची संख्या वाढताना दिसत असली तरी ती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग, सामाजिक संस्था, पोलीस विभाग आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यास नागरीकांनी सुध्दा सहकार्य करून आपल्यासह इतरांचे आरोग्य कसे चांगले राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com