जळगाव :- Jalgaon

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी समोर आला आहे.

याबाबत जळगाव सायबर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

गुलाबराव पाटील यांचा फोटो बदलला

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे https://twitter.com/gulabraojipatil अधिकृत ट्विटर अकाऊंट असून यावरून ते नेहमी ट्विट करत असतात. हे अकाऊंट व्हेरीफाईड देखील आहे. मात्र गेल्या काही तासांपासून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर संशयास्पद बाबी आढळून आल्या आहेत.

यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे त्यांच्या अकाऊंटची आधी सर्वांसाठी खुली असणारी टाईमलाईन ही प्रोटेक्टेड करण्यात आली आहे. यामुळे अर्थातच कुणीही आता त्यांची टाईमलाईन पाहू शकत नाही. यासोबत त्यांच्या प्रोफाईल पीकवरील ना. गुलाबराव पाटील gulabrao patil यांचा फोटो चेंज करण्यात आलेला आहे. त्यांच्या जागी दुसर्याचाच फोटो टाकण्यात आलेला आहे.

ना. गुलाबराव पाटील यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अद्याप तरी कोणतेही संशयास्पद ट्विट करण्यात आलेले नाही. तथापि, सावधगिरीचा उपाय म्हणून याबाबत सायबर खात्याकडे तक्रार नोंदविण्यात आलेली आहे.

रमण मोहन अढळकर (रा. आदर्शनगर, जळगाव) यांनी याबाबत सायबर पोलिसा फिर्याद दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपच्या पेजवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावासमोर आक्षेपार्ह असे लिहल्याचे समोर आले होते. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.