जळगाव : जिल्ह्यात आढळले २१७  करोना बाधित रुग्ण
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात आढळले २१७  करोना बाधित रुग्ण

एकूण रुग्ण संख्या झाली ७४९२

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह २१७ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ७४९२ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ९८, जळगाव ग्रामीणमधील तीन, भुसावळ येथील १६, अमळनेरातील १०, चोपडा येथील ११, पाचोरा येथील ५, भडगाव व धरणगाव येथील प्रत्येकी २, यावल येथील ५, एरंडोल येथील २३, जामनेरातील १२, रावेर येथील १६, पारोळ्यातील १, चाळीसगाव येथील १०, मुक्ताईनगर, बोदवड येथील प्रत्येकी १ आणि परजिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४६५२ रुग्ण बरे झाले आहेत. यातील २३४ रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या २४५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ४४३ रुग्ण अत्यवस्थ आहे. आतापर्यंत एकूण ३८१ रुग्ण दगावले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com