जिल्ह्यात बाधितांची संख्या दोनशेच्या खाली

219 कोरोनामुक्त : सहा रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात बाधितांची संख्या दोनशेच्या खाली

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्य शासनाने बे्रक द चेन अंतर्गत लावलेल्या कडक निर्बधांमुळे आता कुठेतरी दिलासादायक चित्र दिसून येत आहे. हजाराच्या वर पोहचलेली रुग्णसंख्या मंदावत असून आज गुरुवारी जिल्हयात केवळ 194 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 219 बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 22, जळगाव ग्रामीण 13, भुसावळ 15, चोपडा 11, पाचोरा 5, भडगाव 1, धरणगाव 5, यावल 21, एरंडोल 7, जामनेर 13, रावेर 20, पारोळा 2, चाळीसगाव 34, मुक्ताईनगर 5, बोदवड 13 व इतर जिल्ह्यातील 7 याप्रमाणे एकूण 194 नवीन बाधित रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 39 हजार 331 एवढी झाली आहे. तर 1 लाख 30 हजार 276 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.

गुरुवारी जिल्ह्यात 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर दोन, तर एरंडोल, पारोळा, रावेर, भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 516 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com