दसर्‍याच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत नव्या उमेदीची आस...

बाजारपेठेत करोडोची उलाढाल
दसर्‍याच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत नव्या उमेदीची आस...

जळगाव - Jalgaon :

दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने-चांदीबरोबरच दुचाकी वाहने, इलेक्र्ट्रॉनिक्स वस्तू, रेडिमेड कपडे, मोबाईल आदी वस्तूंना शहरातील बाजारपेठेत

चांगला प्रतिसाद दिसून आला असून दिवाळीपयर्र्त आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यापारी दुकानदारांकडून वर्तविला जात आहे.

संपूर्ण आठवडाभर अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर प्रथमच बाजारपेठेत खरेदीचा आनंद लुटला जात आहे. दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. ऑनलाईन खरेदीचा स्थानिक दुकान, व्यवसायावर परिणाम होत असल्याचेही दुकानदारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, दसर्‍याच्या पूर्वसंध्येला सोने-चांदीसह विविध वस्तूंच्या खरेदीतून बाजारपेठेत करोडोची उलाढाल होत आहे.

घटस्थापनेपासून उत्साह संचारला

घटस्थापनेपासून बाजारात विविध वस्तुंसाठी विशेषत: दुचाकी वाहने, सोने चांदी व्यावसाय, इलेक्ट्रॉनिक वस्तू उदा. स्मार्ट टीव्ही, गोदरेज कपाट, मोबाईल खरेदीसाठी विशेषत: तरुणांचा उत्साह अधिक प्रमाणात संचारला असल्याचे बाजारात फेरफटका मारला असता दिसून आले.

दसर्‍याच्या पूर्वसंध्येला शहरातील दुकानदार, व्यावसायिकांकडून जय्यत तयारी सुरु आहे. तर दसरा साजरा करण्यासाठी लहान मुलांसह सर्वाच्या मनात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुचाकींपासून तर रेडिमेड कपडे तसेच विविध खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, झेंडूची फुले सुद्धा 80 रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक वस्तुंना अधिक मागणी

शनिवारी विविध दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली. स्मार्ट टीव्हींना विशेषत: अधिक मागणी असल्याचे लक्ष्मी लेक्ट्रॉनिकचे संचालकांनी स्पष्ट केले.

यात एलईडी टीव्हींना अधिक मागणी आहे. यात 24 इंच, 32 इंच व त्यापुढील मोठ्या प्रकारांच्या टीव्ही विक्रीस उपलब्ध आहेत. यापैकी 32 इंचच्या एलईडी खरेदीस चांगली मागणी आहे.

यात सोशल मिडीयाचा टच असल्याने यू टूब, इंटरनेट आदींचा वापर करता येतो असे लक्ष्मी इलेक्ट्रॉनिकचे संचालक यानी स्पष्ट केले.

तसेच होम थिएटर, स्पीकर हे अधिक प्रमाणात बाजारात वेगवेगळ्या प्रकारात दाखल आहेत. तसेच डिश टीव्ही, ब्लू टूथ स्पिकर या नव्याने बाजारात दाखल होत असलेल्या वर्स्तूनाही अधिक मागणी होत असून अनेक ग्राहक खरेदी करीत असल्याचे एक दुकानदार एस. कुमार रेडीओ या दुकानदारांने स्पष्ट केेले. तसेच रेडिमेड कपड्याना मागणी वाढती असून नटवर टाकीजजवळील कॉम्प्लेक्सध्ये असलेले कपड्यांच्या दुकानांवर मोठी गर्दी दिसून आली.

दुचाकी व्यवसायास अच्छे दिन

घटस्थापनेपासून दुचाकी व्यवसायाला अच्छे दिन येवू लागले आहेत. प्रारंभीच्या दिवसात 30 ते 40 वाहने बुकींग होत होती.

काल शनिवारी मात्र अनेक ठिकाणी हा व्यवसाय वाढला असल्याचे दुचाकी व्यावसायिकांनी सांगितले.

पंकज ऑटोकडे याबाबत विचारणा केली असता 150 ते 200 वाहने बुकींग झाल्याचे पंकज ऑटोचे संचालक योगेश चौधरी यांनी स्पष्ट केले. तसेच अन्य दुचाकी विक्रेत्यांचाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे म्हणणे आहे.

चांदी व्यवसाय तेजीत

गेल्या तीन दिवसापासून ग्राहकांचा मोठा प्रतिसाद सोने खरेदीस वाढू लागला आहे. काल शनिवारी दुपारी 4 वाजेला सोने 51 हजार 600 पर्यंत भाव होते. तरी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद व मागणी कायम असल्याचे रतनलाल बाफना ज्वेलर्सतर्फे मनोहर पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले.

नागरिकांमध्ये कोरोनाची भीतीही आता कमी झालेली आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाला चांगल्या प्रकारे अटकाव करण्यात आरोग्य यंत्रणा व प्रशासन सक्सेस झाली आहे.

त्यामुळे बाजारपेठेत दुकानदार, व्यावसायिक तसेच नागरिकांचीही उमेद वाढली आहे. कोरोनाचा प्रभाव आता क्वचितसा आहे त्यामुळे भिती कमी झाली आहे.

रांगोळी खरेदी

दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ शनिवारी फुलली असून रांगोळी, तयार प्लास्टिक, फुलांची तोरणे, माळ आदी साहित्याची खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

रांगोळी प्रकारात विविध डिझाईनच्या प्लेटा बाजारात येवू लागल्या आहेत, या प्लेटांवर अंगणात नुसती रांगोळी टाकली की आकर्षक डिझाईन अंगणात तयार होते, यात वेळेची बचत होते असे एका इमलाबाई या विक्रेत्या महिलेने सांगितले.

विविध फुलांचे आकर्षक तोरणे, माळ, पुष्पगुच्छ बाजारात रेडिमेड येवू लागले आहेत. तर रांगोळीच्या पुड्या 5 रुपयेपासून ते 10 रुपयापयर्र्त आहेत. छोट्या छोट्या रांगोळीच्या पुड्या महिला पटकन खरेदी करतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com