जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यूनंतर जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहे.

मंगळवार 16 मार्च पासून जिल्ह्यात हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामध्ये अस्थापनांनासह दुकानदारांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यत वेळेची मर्यादा आखून देण्यात आली आहे. तसेच रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे.

जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढू लागला आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट होत चाचली आहे.

कोरोनाची साळखी तोडण्यासाठी शासनाकडून शहरासह जिल्ह्यात काही िइकाणी जनता कफर्यु लावण्यात आला आहे. परंतु तरी देखील रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

यात जिल्ह्यातील सर्व, शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र, खासगी क्लासेस मंगळवार पासून बंद ठेवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे.

तसेच इयत्ता दहावी व बारावीसाठी पालकांच्या संमतीने विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार आहे. त्याप्रमाणे पूर्वीच घोषित करण्यात आलेल्या परीक्षा देखील कोविडच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सिनेमागृह, बगिचे बंदच

क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलन यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच जीम, व्यायामशळा, स्पोर्ट कॉम्पलेक्स, खेळाची मैदाने, स्विमींग टँक हे खेळाडूंना सरावासाठी खूली राहणार आहे. तसेच सिनेमागृह, बगिचे, नाट्यगृह हे पूर्णपणे बंद राहणार आहे.

पार्सलसाठी 10 तर बियरबारसाठी 9 ची वेळ

जिल्ह्यातील परमिट रुम, बियरबार व हॉटेल्सना 50 टक्के उपस्थितीनूसार प्रशासनाकडून सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंतची वेळेची मर्यादा आखून देण्यात आली आहे. यातच होम डिलीव्हरीसाठी असलेले किचन हे रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याठिकाणी कुठल्याही नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बाजार समितीमध्ये केवळ भाजीपाला विक्री करणारे शेतकरी, खरेदी करणारे घाऊक व्यापारी यांनाच प्रवेश द्यावा. रिटेल व किरकोळी विक्रेत्यांना याठिकाणी प्रवेश देवून नये ही जबाबदारी बाजार समितीचे सचिव यांची राहणार आहे.