करोनाग्रस्तांचा दहा हजारांचा टप्पा पार

सोमवारी पुन्हा नव्याने आढळले 312 रुग्ण
करोनाग्रस्तांचा दहा हजारांचा टप्पा पार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केल्याने आता जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 10044 इतकी झाली आहे. सोमवारी जळगाव जिल्ह्यात 312 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे.

सोमवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरात 41, जळगाव ग्रामीण भागात 11, भुसावळमधील 10, अमळनेरातील 25, चोपडा येथील 26, पाचोरा येथील 08, भडगावातील 11, धरणगावमधील 14, यावल येथील 10, एरंडोलमधील 03, जामनेरातील 63, रावेर येथील 13, पारोळ्यातील 17, चाळीसगाव येथील 43, मुक्ताईनगरातील 13, बोदवड 01 तर परजिल्ह्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 6505 रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील 214 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 3070 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 469 रुग्ण दगावले. यात 2 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. तसेच 139 रुग्णांना होम आयसोलेशन (पॉझिटिव्ह रुग्ण) केले आहे.

जिल्ह्यातील 2 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यात दोन्ही मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव तालुक्यातील 72 वर्षीय पुरुष, तर अमळनेर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com