<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>शहरातील मंगल कार्यालयांमध्ये खुद्द जिल्हाधिकारी यांनी आज पाहणी केली.</p>.<p>पाहणीत कुठल्याही प्रकारे कोरोना नियमांचे पालन केले जात नसून ५० पेक्षा जास्त नागरिक सोहळ्याला उपस्थित असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंगल कार्यालय मालकांसह वधू व वराकडील मंडळीवर गुन्हे दाखल झाले आहेत. यात एमआयडीसीतल श्रीकृष्ण लॉन्स, बालानी लॉन, ढाकेवाडी येथील मुक्तांग हॉल यांच्यावर गुन्हे दाखल आहे. इतरही ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी सुरु असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.</p>