जळगावात 25 हजारात रेमडीसीवीर विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश

जळगावात 25 हजारात रेमडीसीवीर विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जळगाव शहरात ठिकठिकाणचे स्पॉट निवडून तेथून काळ्या बाजारातील रेमडीसीवीर इंजेक्शन 25 हजार रुपयात विक्री करणार्‍या टोळीचा पोलिसांनी आज गुरुवारी पर्दाफाश केला आहे.

शहरातील भास्कर मार्केट, रामानंदनगर, डोमीनोझ पिझ्झा यासह इतर ठिकाणांहून अशा पध्दतीने पाच ते सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी उशीरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कारवाई सुरु होती. ताब्यात घेतलेल्यांच्या चौकशीनुसार यात मोठी साखळी सक्रीय असल्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज एक हजारांच्या संख्येत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे.

तर दुसरीकडे जिल्हयात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्य रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. याचा फायदा घेवून काळ्याबाजारात रेमडीसीवरची इंजेक्शन विक्रीसाठी टोळी सक्रिय होती.

रेमडीसीवीर इंजेक्शनची शासकीय किंमत 1200 रुपये असतांना तब्बल 25 हजार रुपयांत एक याप्रमाणे इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.

त्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसांसून पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाकडून याबाबत तपास सुरु होता. तपासात शहरात विविध ठिकाणाहून तरुण तब्बल 25 हजार रुपयांत विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानुसार पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी आज त्याच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांसह क्यूआरटी पथकातील कर्मचार्‍यांचा फौजफाटा सोबत घेत शहरात डोमीनोझ पिझ्झा, रामानंदनगर परिसरात रेल्वे रुळालगत, भास्कर मार्केट यासह इतर ठिकाणांहून पाच तरुणांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून काही जणांची नावे समोर आली. यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. शेवटचे वृत्त हाती तोपर्यंत 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली.

उशीरापर्यंंत पोलिसांची चौकशी सुरु होती. चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com