पोलीस कर्मचारी घोळक्यात बसून करत होता मद्यप्राशन अन्... डीवाएसपी धडकले

पोलीस कर्मचारी घोळक्यात बसून करत होता मद्यप्राशन अन्... डीवाएसपी धडकले

पोलन पेठेतील घटना : दुचाकी सोडून झाला पसार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील पोलनपेठेतील गल्ली बोळात शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दीपक सोनवणे हे काही जणांसोबत मद्यप्राशन करत होता, याचदरम्यान पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा परिसरात करोनाच्या पार्श्वभूमिवर फेरफटका मारत होते.

पोलीस उपअधीक्षकांना पाहताच मद्यप्राशन करणार्या पोलीस कर्मचार्याने दुचाकी सोडून धूम ठोकल्याची घटना आज बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.

त्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी बोलतांना सांगितले.

शहर पोलीस ठाण्याचा कर्मचारी दीपक सोनवणे याच्यासह काही जणांना घोळका पोलन पेठतील गल्लीत मद्यप्राशन करत होता. याचदरम्यान पोलीस उपअधीक्षक कमुार चिंथा हे याच परिसरात करोनाच्या पार्श्वभूमिवर पाहणी करत होते.

पाहणीदरम्यान कुमार चिंथा यांना घोळका मद्यप्राशन करत असतांना दिसून आला. सोबत असलेल्या कर्मचार्यांना कारवाईच्या सुचना दिल्या. याचवेळी पोलीस उपअधीक्षकांच्या कारवाईपूर्वीच त्यांना पाहताच घोळक्यात बसलेला शहर पोलीस ठाण्याचा कर्मचारी दिपक सोनवणे या पळत सुटला व दुचाकी सोडून पसार झाला.

यानंतर चिंथा यांनी कारवाई करुन संबधित ठिकाणी सापडलेल्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या. त्यातील एका दुचाकीला पोलिसांचा दंडुका लावलेला होता.

या गाड्या शहर पोलीस ठाण्यात जमा केल्यावर, पोलिसाच्या दंडुक्यावरुन ही गाडी याच पोलीस ठाण्यातील कर्मचारी दिपक सोनवणे याची असल्याचे निष्पन्न झाले.

चिंथा यांनी दिपकचा शोध घेवून त्याला ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्यावर कर्मचारीनी त्याला ताब्यात घेत त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली.

दरम्यान दिपक सोनवणे हा घटना घडली त्यावेळी ड्युटीवर नव्हता, त्याची आज रात्रपाळी असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकाराबद्दल सोनवणे यांचा पोलीस अधीक्षकांकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती कुमार चिंथा दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com