प्रौढाला लुटणार्‍या ’डफली‘ला मध्यप्रदेशातून अटक

प्रौढाला लुटणार्‍या ’डफली‘ला मध्यप्रदेशातून अटक

स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

जळगाव - Jalgaon :

भुसावळातील प्रौढाच्या दुचाकीस लाथ मारुन खाली पाडत तीघांनी मारहाण करीत सोन्याची चेन, मोबाईल व दहा हजार रुपयांची रोकड असा २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना १९ एप्रिल रोजी साकेगावजवळ फार्मसी कॉलेजच्या मागे घडली होती.

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाख या गुन्ह्यातील मुख्य संशयित आदर्श उर्फ डफली बाळु तायडे (वय २३, रा. न्यू आंबेडकर नगर भुसावळ) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातून अटक केली आहे.

दोन दिवसांपासून पथक त्याच्या मागावर होते. एकदा यावल व दुसर्‍यांदा रावेर तालुक्यातून तो निसटला होता. अखेर पथकाने त्याच्या मध्यप्रदेशातून मुसक्या आवळल्या.

त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.साकेगाव येेथील फार्मसी कॉलेजच्या मागे १९ एप्रिल रोजी येथे राहणार्‍या विनोद बजरंग परदेशी (वय ५१, साकेगाव) यांच्या धावत्या दुचाकीस लाथ मारुन त्यांना खाली पाडले.

यानंतर त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील दोन सोन्याच्या चेन, मोबाईल व दहा रुपये रोख असा २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन्ही संशयित दुचाकीने बेपत्ता झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com