घरफोडी करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

घरफोडी करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

जळगाव - Jalgaon :

शहरातील मोहाडी रोडवर पद्मावती अपार्टमेंटमध्ये घरफोडी करणार्‍या प्रकाशसिंग मितसिंग बावरी वय २८ व हिम्मतसिंग चरणसिंग बावरी वय ३२ दोन्ही रा. शिरसोली नाका, तांबापुरा या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरुवारी सायंकाळी तांबापुरा परिसरातून अटक केली आहे.

शहरातील मोहाडी रोड परिसरात पद्मावती अपार्टमेंटमध्ये योगराज परशुराम चिंचोरे हे कुटुंबासह राहतात. गुढीपाडव्यासाठी ते कुटुंबासह त्यांच्या जळगाव तालुक्यातील म्हसावद या मूळगावी गेले होते.

त्यांच्या बंद घरातून दोन हजार रुपये रोख व ४ हजार रुपये किंमतीचे २ भाराचे चांदीचे दागिणे असा एकूण ६ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना १४ एप्रिल रोजी समोर आली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

दरम्यान शिरसोली नाका परिसरातील दोन जणांनी ही घरफोडी केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील दामोदरे, शरद भालेराव, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, नंदलाल पाटील, भगवान पाटील यांच्या पथकाला सुचना केल्या होत्या. त्यानुसार पथकाने आज गुरुवारी सायंकाळी तांबापुरा परिसरातील शिरसोली नाका येथून प्रकाशसिंग बावरी व हिम्मतसिंग बावरी या दोघांना अटक केली.

चौकशीत देाघांनी मोहाडी रोड परिसरात घरफोडी केल्याची कबूली दिली आहे. दोघांना पुढील कारवाईसाठी रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com