दुचाकी रॅली काढणार्‍या आठ जणांवर गुन्हा दाखल

रामानंदनगर पोलिसांची कारवाई
दुचाकी रॅली काढणार्‍या आठ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव - Jalgaon :

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल बुधवार १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील काव्यरत्नावली चौकात आठ ते दहा जण एकत्र घेवून दुचाकींवर संत गाडगेबाबा चौक ते काव्यरत्नावली चौक दरम्यान झेंडे घेवून घोषणाबाजी करत होेते.

गस्तीवर असलेल्या रामानंदनगर पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी करोनाच्या पार्श्‍वभूमिवर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शुभम मिलींद पवार (वय-२५) रा. केदार नगर, पिंप्राळा, स्वप्निल दिलीप खंडारे रा. पिंप्राळ हुडको, शुभम संजय शिरसाळे, विशाल भिमराव खैरनार, रा. पिंप्राळा हुडको, जितेंद्र शरद सोनवणे रा. आसोदा जळगाव, अनुराग मांगो सोनवणे रा. शिरसोली जळगाव, अनिरूध्द अनिल गाढे (वय-१८) रा. समता नगर आणि विक्की चवदास सोनवणे रा. शिरसोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील करीत आहे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com