व्यापार्‍यांची फसवणुक करणार्‍या संशयिताला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न
व्यापार्‍यांची फसवणुक करणार्‍या संशयिताला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

जळगाव - Jalgaon :

शहरातील एमआयडीसीतील दालमील असलेल्या सात व्यापार्‍यांची विविध प्रकारची दाळ ही खरेदी करुन त्याबदल्यात व्यापार्‍यांचे पैसे न देता त्यांची ४५ लाख ६६ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी निलेश वल्लभाई सुदाणी वय ३९ रा. वराछा, सुरत यास अटक केली आहे.

एका दिवसाच्या चौकशीनतंर आज मंगळवारी संशयित निलेश सुदाणी यास जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान संशयित निलेश विरोधात गुजरात राज्यातील शहर पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

शहरातील व्यापार्‍यांच्या फसवणुकीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्हयात संशयितांनी बनावट नाव, तसेच मोबाईल नंबरचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. काल सोमवारी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित निलेश सुदाणी याच्या केलेल्या चौकशीत संशयितांनी जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवरील हॉटेलात वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलिसांनी संशयितांचे त्या दिवसाचे मोबाईल लोकेशन तपासले असता, संशयित निलेश सुदाणी २५ डिसेंबर व २६ डिेसेंबर २०२० रोजी हा जळगाव शहरातील त्याने सांगितलेल्या हॉटेलात वास्तव्यास असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

दरम्यान आज संशयित निलेश सुदाणी यास तपासअधिकारी अतुल वंजारी यांनी जिल्हा न्यायालयात हजर केले. न्या. प्रिती श्रीराम यांनी संशयितास १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयिताला घेवून पथक गुजरामध्ये जाणार

या गुन्हयात संशयित निलेश सुदाणी याच्या केलेल्या चौकशीत त्रृषी देसाई व अरविंद क्याडा या दोन संशयितांची नावे समोर आली आहे. या गुन्हा करतांना सर्व संशयितांचा सुरुवातीपासून फसवणुकीचा उद्देश होता. त्यामुळे सर्वांनी नाव, पत्ते खोटे सांगत हा गुन्हा केला आहे.

तसेच ज्या हॉटेलात वास्तव्य केले तेथेही संशयितांनी बनावट कागदपत्राच्या आधारावर वास्तव्य केले. आता ज्या संशयितांची नावे निष्पन्न झाले आहेत. त्या संशयितांच्या शोधार्थ अटक केलेल्या संशयित निलेश सुदाणी यास सोबत घेवून एमआयडीसी पोलिसांचे पथक सुरत, राजकोट येथे असल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच संशयितांनी हॉटेलात वास्तव्य करतांना जी बनावट कागदपत्रे दिली, ती कागदपत्र ज्या नावाची होती. त्यांचाही या गुन्हयात समावेश आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com