जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्यात बहुचर्चीत असलेल्या गणेश कॉलनी येथील शासकीय महिला आशादीप वस्तीगृहातील मुलींचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण करून ते व्हायरल केल्याच्या प्रकरणात साहिल अयुब पठाण (वय 22) रा.चांदसर,ता. धरणगाव याला जिल्हापेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली.

गेल्या महिन्यात 2 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास साहिल पठाण याने आशादीप वस्तीगृहातील मुलींचे मोबाईलमध्ये मुलींचे व्हिडीओ चित्रण केले होते. तसेच हा व्हिडीओ व्हायरल केला होता.

त्याच्यासोबत असलेल्या दुसर्याने प्रवेशद्वारा लाथ मारून वसतीगृह कर्मचार्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता.

याप्रकरणी संजना सचिन पाटील (32) रा. वरणगाव यांच्या फिर्यादीवरून 8 मार्च रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साहिल याला दोन दिवसापूर्वी रामानंद पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

शनिवारी त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला जामिनावर मुक्त करण्यात आले. सरकारपक्षाककडून अॅड. आशा शर्मा यांनी काम पाहिले.