दारुच्या नशेत पत्नीला पेटवले; पतीस अटक
जळगाव

दारुच्या नशेत पत्नीला पेटवले; पतीस अटक

Balvant Gaikwad

दारुच्या नशेत पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देणार्‍या पतीस पोलिसांनी अटक केली आहे. जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.

रामेश्वर कॉलनीतील भाजलेली महिला रुबिना कलीम पठाण (वय 25) यांना 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या मावशीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तिचे पती कलीम मोहम्मदखाँ पठाण यास दारुचे व्यसन असून तो दररोज घरात वाद घालून पैसे मागतो. 17 रोजी देखील असाच वाद झाला. त्याने दारुच्या नशेत अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले, अशी तक्रार तीने केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com