जळगाव : पिंप्राळा हुडकोतील बालिकेचा संशयास्पद मृत्यू
जळगाव

जळगाव : पिंप्राळा हुडकोतील बालिकेचा संशयास्पद मृत्यू

Balvant Gaikwad

जळगाव । प्रतिनिधी
पिंप्राळा हुडकोतील एका चार वर्षीय बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी दुपारी  संशयास्पदरित्या तिच्याच राहत्या घराजवळील बिल्डींगच्या जिन्यात आढळला.    या मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी केला. त्यामुळे घरी नेलेला मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.  
या मुलीसह आई-वडिलांना   नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी जायचे होते. त्यामुळे आई-वडिलांनी तयारीसाठी मुलीला सकाळी 11 वाजता घरातच आवाज दिला. त्या वेळी ती घरात नव्हती. म्हणून तिचा शोध शेजारी व  परिसरात बराच वेळ घेतला. परंतु, ती सापडत नव्हती. म्हणून ती हरवल्यासंदर्भात काही जणांनी प्रार्थनास्थळातून लाऊड स्पीकरवर अलाऊन्स केले. त्यानंतर काही वेळाने त्या बालिकेचा मृतदेह नजीकच्या बिल्डींग ए, रुम नं59 जवळील जिन्यावर अत्यवस्थ स्थितीत नजीकच्या मुलीला आढळला. हे ठिकाणी नेहमी वापरातील आहे. अगोदर तेथे काहीच नव्हते. नंतर बालिकेचा मृतदेह आढळला.

 बेपत्ता होण्याअगोदर  त्या बालिकेच्या अंगावर फक्त छोटी पँड होती. नंतर ती जिन्यात आढलली तेव्हा तिच्या अंगावर पँड होतीच. तर तिचे शरीर पाण्याने ओले, साबण लावल्यासारखे चिकट,  तोंडात फेस होता. तर नाकातून पाणी टपकत होते.

शेजारच्या मुलीने अत्यवस्थ त्या बालिकेस नजीकच्या एका महिलेच्या घराजवळ आणले. पण, इथे कशाला आणली, त्या बालिकेला तिच्या घरी घेवून जा, असे त्या महिलने सांगितले आणि याच वेळी ती मुलगी व बालिका शोध घेणार्‍या इतरांना दिसली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच तिला काही जणांनी जिल्हा रुग्णालयात आणले. परंतु, तिचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. बालिकेचा मृतदेह घरी नेण्यात आला. पण, तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या नातेवाईकांची गर्दी झाली. तर पालिसांनी पंचनामा केला.

Deshdoot
www.deshdoot.com