बचतगटाच्या माध्यमातून महिलांची फसवणूक

बचतगटाच्या माध्यमातून महिलांची फसवणूक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

लघुउद्योगासाठी बचत गट तयार करुन या बचत गटांच्या आधारावर 13 लाख 50 हजार 250 रुपयांचे कर्ज काढून जळगाव शहरातील आदर्शनगरसह विविध ठिकाणच्या महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यात पोलिसांनी संगीता निरज जोशी वय 47 व निरज मदनलाल जोशी वय 48 दोन्ही रा. गुजर खर्दे ता. शिरपूर जि.धुळे या दाम्पत्याला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली.

दोघांना न्यायालयात हजर केले असता 1 मार्च पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आदर्श नगर येथील वत्सला रमेश पाटील यांच्यासह काही महिलांना एकत्र करत लघुउद्योग सुुरु करण्याचे आमिष दाखविले.

तसेच त्यातून पैसे मिळतील असेही सांगण्यात आले. यानंतर महिलांचा बचतगट स्थापन करण्यात येवून 5 जुलै 2019 ते 1 फेब्रुवारी 2020 दरम्यान बचतगटातील वेगवेगळ्या महिलांच्या नावाने कर्ज पास करुन घेवून 13 लाख 50 हजार 250 रुपये एवढी रक्कम काढण्यात आली.

ही रक्कम ठरल्यानुसार न वापरता संगीता निरज जोशी यांच्यासह संशयितांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली, व फसवणूक केली.

दरम्यान फसवणूक झाल्याले लक्षात आल्यावर वत्सला जोशी या इतर महिलांसह पैसे मागण्यास गेले असता, संशयितांनी महिलांना शिवीगाळ व दमदाटी करुन हाकलून लावले होत.

अशा आशयाच्या वत्सला रमेश जोशी यांच्या फिर्यादीवरुन संगीता निरज जोशी, निरज मदनलाल जोशी, जागृती निरज जोशी, अशोक जयनारायण शर्मा, संतोष जयनारायण शर्मा, संजय जयनारायण शर्मा यांच्या विरोधात 26 जानेवारी 2020 रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या गुन्ह्यात 24 फेब्रुवारी रोजी संशयित निरज जोशी यास 24 फेब्रुवारी रोजी व संगीता जोशी यास 25 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.

दोघांना 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर संशयित अशोक शर्मा, संतोष शर्मा व संजय शर्मा या तिघा भावंडांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर जागृती जोशी ही या गुन्ह्यात फरार आहे.

संशयित निरज व संगीता जोशी यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश जी.जी.कांबळे यांनी दोघांना 1 मार्चपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. रंजना पाटील यांनी काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com