<p>जळगाव :- शहरातील मोहाडी रोड लगत असलेल्या दुमजली घरात पाच ते सहा जणांनी दरोडा टाकुन पंचवीस ते सव्वीस लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना बुधवारी समोर आली आहे.</p>.<p>हिंदी भाषेत बोलणारे पाच ते सहा जण पहाटेच्या सुमारास लाकडी दरवाजा तोडुन घरात घुसले. यानंतर त्यांनी घरातील पुरूषाला मानेला चाकु लावत घरात जे असेल ते काढुन देण्याचे सांगत दागिण्यांसह पाच ते सहा लाखांचा ऐवज लुटुन नेला.</p><p>घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे , अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी भेट देवुन पाहणी केली व माहिती जाणुन घेतली. स्थानिक गुन्हे शाखेसह ठसे तज्ञ व पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला आहे.</p>