जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील मेहरूण येथील माहेरवाशिनीचा चरित्र्याच्या संशयावरून माहेरहून व्यवसायासाठी 5 लाख रूपये तर दुसर्या घटनेत रामेश्वर कॉलनीतील विवाहितेचा 1 लाख रुपयांसाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या दोन्ही घटनांमध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी पोसिलात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीत राहणारी 27 वर्षीय विवाहितेचा सुरत येथील उमेश दत्तू लोहार यांच्याशी सहा वर्षांपुर्वी विवाह झाला.

सुरूवातीला काही दिवस आनंदाने गेल्यानंतर जून 2014 पासून पिठाची गिरणीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून 5 लाख रूपयांची मागणी पुर्ण न झाल्यामुळे पती उमेश लोहार यांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसचे विवाहितेच्या चरित्र्यावर संशय घेवून चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली आहे.

सासरच्या मंडळींनी केले पतीला प्रोत्साहित

सासरे दत्तू भाऊलाल लोहार, सुमन दत्तू लोहार, जेठ जगदीश दत्तू लोहार, जेठाणी आरती जगदीश लोहार, नणंद मनिषा मनोज लोहार, नणंदोई मनोज लोहार सर्व रा. पांडेसरा, सुरत गुजरात यांनी देखील छळ करण्यासाठी पती उमेश लोहार याला प्रोत्साहित केले.

हा प्रकार असहाय्य न झाल्याने विवाहित जळगाव येथील माहेरी निघून आल्यात. पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून पती उमेश लोहार सह सासरकडील सात जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नात मानपान केला नाही म्हणून छळ

रामेश्वर कॉलनीतील विवाहिता कविता किरण पाटील (वय-21) ह.मु. सुप्रिम कॉलनी जळगाव यांचा विवाह शहरातीलच रामेश्वर कॉलनीतील किरण ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी झालेला आहे.

पती किरण पाटील यांनी मालवाहतूकीच्या व्यवसायासाठी पत्नी कविताला माहेरहून 1 लाख रूपये आणायला सांगितले.

तसेच लग्नात कोणताही मानपान केला नाही म्हणून मानसिक व शारिरीक छळ करण्यास सुरूवात केली. तसेच विवाहितेची सासू व सार्यांनी देखील त्यांचा छळ करण्यास पाठबळ देत टोमणे मारुन शिवीगाळ केली.

याप्रकरणी याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासू व सासरे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.