जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

नशिराबाद येथे दोन अनोळखी महिलांनी तूप विक्रीच्या बहाण्याने एका दापत्याला संमोहित करून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल एक लाख 99 हजार 821 रुपयांचा ऐवज लांबविला आहे.

याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने गावातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

जेवणाचा पाहुणचारही घेतला

नशिराबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पुरुषोत्तम बारसू तेली वय 65 हे पत्नी शकुंतला यांच्यासह वास्तव्यास आहेत.

28 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तेली यांच्या घरी दोन महिला शुद्ध तूप घ्या असं सांगत विचारपूस करत होत्या.

दोनशे रूपये किलोचा भावाने तूप खरेदी करा असा आग्रह करीत त्यांनी प्यायला पाणी मागितले. त्यानंतर घरात शिरकाव करीत जेवायला मिळेल का अशी विचारणा करून त्या दाम्पत्याने जेवणाचा पाहुणचारही घेतला.

संमोहनानंतर घरातून दोघांना दिले दागिणे व रोकड

जेवणानंतर दोघा महिलांनी शंकुतला यांना संमोहित केले. संमोहित झालेल्या शंकुलता यांना दोघा महिलांना घरातून प्रत्येकी पाच ग्रॅम 34 हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याची साडे तीन तोळा वजनाची एक लाख एक हजार 821 रुपये किमतीची चैन , 34 हजार रुपये किमतींच्या दोन सोन्याच्या वेली जोडी व तीस हजार रुपये रोख असा तब्बल एक लाख 99 हजार 821 रुपयांचा ऐवज काढून दिला.

ऐवज दिल्यानंतर संमोहित तेली दाम्पत्य दोघा महिलांना तरसोद फाट्यापर्यंत सोडायला सुध्दा गेले. सोडून घरी परतल्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. तोपर्यंत दोघेही महिला पसार झाल्या होत्या.

याप्रकरणी पुरुषोत्तम बारसू तेली यांनी फिर्याद दिल्यावरून नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण पोलीस, मोहन चौधरी तपास करीत आहे

असे दोन्ही महिलांचे वर्णन

फिर्यादीत दिल्यानुसार अनोळखी दोन्ही महिलांनी काठेवाडीसारखा पेहराव नेसलेला होता त्यापैकी अंदाजे सुमारे 25 ते 30 वयोगटातील महिलेने घागरा, त्याचा लाल रंग गुलाबी रंगाची चोळी गुलाबी रंगाचा स्कार्फ तर दुसर्या अंदाजे वय 45 ते 50 वयोगटातील महिलेने अंगात लाल रंगाचे ब्लाउज परिधान व पांढर्या रंगाचा स्कार्प बांधलेला होता त्यातील एका महिला रंगाने काळी व दुसरी महिला रंगाने निंमगोरी होती. शरीराने दोघी सडपातळ होत्या उंची साधारण साडेपाच फूट असे दोन्ही महिलांचे वर्णन आहे.