शहर पोलीस ठाण्यात तक्रारदारांमध्येच ‘फ्री स्टाईल’

पोलिसांनी फिर्यादी होवून चौघांविरोधात केला गुन्हा दाखल
शहर पोलीस ठाण्यात तक्रारदारांमध्येच ‘फ्री स्टाईल’

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

आपसात झालेल्या वादाची तक्रार द्यायला आलेले दोन्ही गटांमध्ये पोलीस ठाण्यातच फ्री स्टाईल झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

याप्रकरणी पोलिसांनीच फिर्यादी होऊन दोन्ही गटाच्या नाजीमखा कादीरखा पटवे (30), फरीदाबी जुबेर खान (35) दोन्ही रा.गेंदालाल मील, सिंकदर उस्मान खान (39) व शोभा मुकेश पवार (35,रा.इंद्रप्रस्थ नगर) यांच्याविरुध्द कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे अंमलदारासमोरच मारहाण

सूत्रांच्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून मंगळवारी सायंकाळी सहायक फौजदार संगीता खांडरे या ड्युटीला होत्या.

यावेळी सिंकदर खान व शोभा पवार या आपसात झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या.

यावेळी ठाणे अंमलदाराजवळ गेंदालाल मीलमधील नाजीमखा कदरखा पटवे, रिजवानाबी शेख आमीर,आबेदाबी व फरीदाबी जुबेर यांनी मागील भांडणाच्या कारणावरुन आम्हाला मारहाण केली अशी तक्रार नोंदवत असतानाच हे चौघे तेथे आले व आरडाओरड करुन त्यापैकी नाजीमखा पटवे, फरीदाबी जुबेरखान यांनी सिंकदर व शोभा यांना मारहाण करायला सुरुवात केली.

अचानकच्या प्रकारामुळे गोंधळ

अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळ निर्माण झाला. तेव्हा उपनिरीक्षक अरुण सोनार, ठाणे अंमलदार संगीता खांडरे, भूषण पाटील, संगीता इंगळे व मनीषा चव्हाण यांनी हस्तक्षेप करुन दोघं गटाचा वाद मिटविला.

पोलीस ठाण्यातच झोंबाझोंबी केली म्हणून भूषण पाटील या कर्मचार्‍याच्या फिर्यादीवरुन चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com