जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील खेडी बुद्रूक येथे दोन महिन्यपूर्वीच सुरत येथून खेडी येथे नातेवाईकाकडे राहण्यास आलेल्या भाजीपाला विक्रेता लक्ष्मण महादू पाटील (वय 55) यांचा पोटात चाकू खुपसल्याने गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची घटना

1 जानेवारी रोजी घडली होती. दरम्यान हा खून आहे की, भाजीपाला विक्रेत्याने संतापात स्वतःच पोटाच चाकू खुपसला, हे नेमके निष्पन्न झालेले नाही.

दरम्यान घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षकांनीही भेट देवून माहिती जाणून घेतली आहे. घटनेच्या चहू बाजूने एमआयडीसी पोलीस या गून्ह्याचा तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उधना सुरत येथे लक्ष्मण पाटील, वास्तव्यास होते. नुकत्याच दोन महिन्यांपासून ते खेडी बुद्रूक येथे त्यांचा पुतण्या ज्ञानेश्वर अशोक पाटील याच्याकडे रहायला आले होते. भाजीपाला विक्री करुन ते उदरनिर्वाह भागवित होते. 1

जानेवारी रोजी लक्ष्मण पाटील यांनी दारु पिण्यासाठी राहत असलेल्या कुटुंबियांकडे पैसे मागितले. पैसे देण्यास नकार मिळाल्यानंतर काही वेळातच लक्ष्मण पाटील हे पोटात चाकू मारल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

यानंतर त्यांना त्याच्या पुतण्यासह कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यिकीय अधिकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी त्यास मृत घोषीत केले.

नेमका चाकू कोणी मारला ? हे कळेना

खून आहे की पाटील यांनीच स्वत: च्या हाताने पोटात चाकू खुपसला आहे, याबाबत पोलीसही संभ्रमात आहेत.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात गंभीर दुखापतीमुळे मृत्यू म्हटले असून नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.

घटना नेमकी काय आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पाटील यांचा मृत्यू कसा झाला या गुंता वाढल्याने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळाला भेट देत घटनाक्रमासह माहिती जाणून घेतली. नेमका चाकू कोणी मारला याची चौकशी करुन मयत पाटील यांच्या पुतण्यासह कुटुंबियांचा जबाब घेण्याचे काम शनिवारी सुरु होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे करीत आहेत.