जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहर पेालिस ठाण्या शेजारीच केळकर मार्केट मध्ये दोन दुकाने फोडून 15 हजाराची रोकडसह एका घरातून गव्हाची गोणी, 2 होम थिएटर लांबविणार्या शिवाजीनगर हुडको येथील तीघे 17 वर्षीय अल्पवयीन चोरट्यांना 30 डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील केळकर मार्केटमध्ये मनोजकुमार हुकूमचंद दुग्गड (वय 52 रा. गणेश कॉलनी) याचे मालकीचे दुकान( नं 9) त्रृषभ होजिअरी आहे.

याच दुकानाच्या शेजारी दुकान नं 8 हे प्रदीप लालचंद कटारिया (रा. सिंधी कॉलनी) यांचे बाबा गारमेंट हे आहे. शनिवार(ता. 26)च्या रात्री दुकानात पाहणी केली असता दुग्गड यांच्या दुकानातील रोकड असलेले ड्राव्हर तोडून त्यामधील 9 हजार रुपये चोरट्यांनी लांबविले होते.

तर कटारिया यांच्या दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता तर त्यांच्याही दुकानातून 600 रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली होती.

तसेच बळीराम पेठेतील श्रेया अपार्टमें मधील विजय काशीनाथ देशमुख यांच्या घराचे कुलूप तोडून गव्हाची गोणी, होम थिएटर्स चोरुन नेण्यात आला होता.

सीसीटीव्हीत कैद चोरट्यांच्या टोळीला शहर पोलिसांनी अटक केली असून संशयीतांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.

याचदरम्यान त्यांनी बळीराम पेठेतील भागचंद कुंदनमल जैन यांच्याही बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणाहून कॉपरचे वायरचे बंडल लांबविले होते, त्याचीही त्यांनी कबूली दिली आहे.

या पथकाची कारवाई

दरम्यान अल्पवयीन चोरटे चोरी करुन मिळालेल्या पैशांमधून पार्ट्या तसेच मौजमजा करीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.

त्यानुसार शहर पोलीस स्टेशनचे विजय निकुंभ, अक्रम शेख, वासुदेव सोनवणे, रतन गिते यांच्या पथकाने संशयीतांना 30 डिसेंबर रोजी शिवाजीनगर हुडको मधून ताब्यात घेतले आहे. संशयीत अल्पवयीन असल्याने त्यांना बाल न्याय मंडळा समक्ष हजर करण्यात आले.