जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

एक लाख रुपये देवून विवाह झाला परंतु लग्नाच्या दुसर्याच दिवशी नववधू रफुचक्कर झाली होती. पैसे ही गेले आणि पत्नीही सोडून गेली या नैराश्यातून कुसूंबा येथील तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी लग्नासाठी पैसे घेवून मध्यस्ती करणार्या दोन महिलांना अटक करण्यात आली होती तसेच लग्नाच्या दुसर्या दिवशीच फरार झालेल्या नववधूला चक्क तिच्या पहिल्या प्रियकरासोबत पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातून शनिपेठ पोलिसांनी अटक केली. या विवाहित महिलेने आतापर्यंत दोन वेळा लग्न त्यांची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील सामरोद येथील कैलास संतोष चावरे हा गेल्या 12 वर्षांपासून जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे आपल्या बहिणीकडे वास्तव्यास होता.

दोन महिलांनी कैलासकडून विवाहासाठी एक लाख रुपयांची रक्कम घेत त्याचा उज्वला गाढे हीच्यासोबत दुुसरा विवाह लावूून दिला होता.

परंतु लग्नाच्या दुसर्याच दिवशी नववधू रफूचक्कर झाल्याची घटना 31 जुलै रोजी घडली होती. दरम्यान 1 जुलैला कैलास व त्याचे मेव्हणे पैसे घेवून मध्यस्ती असलेल्या शनीपेठेतील लिलाबाई यांच्याकडे जावून घटनेची माहिती दिली.

तसेच त्यांना दिलेले पैसे परत मागितले असता, त्यांनी पैसे मिळणार नाही असे सांगताच कैलास चावरेंनी लिलाबाईच्या घराजवळ विष प्राशन केले होते. दरम्यान त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली होती.

याप्रकरणी लिलाबाई रामनारायण जोशी व पदमा सुधाकर खिल्लारे उर्फ संगिताबाई रोहिदास भालेराव उर्फ संगिता रमेेश पाटील यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दोघ मध्यस्ती महिलांना पोलिसांनी अटक केली असून फसवणुक करणारी नववधू फरारच होती.

पहिल्या पतीला धोका दिल्याने झाला मनोरुग्ण

संशयित आरोपी नववधू उज्वला गाढे हीने काही वर्षांपूर्वी रावेर तालुक्यातील विवरे येथील सचिन पाटील याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. उज्वला ही सचिनसोबत मुक्ताईनगर येथे राहत होती. सचिनला दारुचे व्यसन असल्याने उज्वलाचे याच गावातील आकाश भागवत बोदडे याने उज्वलासोबत प्रेमसंबंध निर्माण करीत त्याला धोका दिला. आपल्या पत्नीचे दुसर्यासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे सचिन पाटील हा मानसिक आजारी पडला असून तो मुक्ताईनगरात मनोरुग्ण म्हणून वावरत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

अन् अत्याचार करणार्यासोबतच राहत होती विवाहिता

उज्वला गाढे ही आपल्या प्रियकर आकाशविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्याने चार महिने शिक्षा भोगल्यानंतर तो जामिनावर आल्यापासून रफूचक्कर झालेली उज्वला गाढे ही आकाशसोबत पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात वास्तव्यास होते.

900 कि.मी.चा प्रवास करीत घेतले ताब्यात

रफूचक्कर झालेली नववधू पुणे येथील रांजणगाव एमआयडीसीत असल्याची माहिती शनीपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी दिनेशसिंग पाटील यांना मिळाली. त्यांनी याबाबत पोलीस निरीक्षक विठ्ठल ससेंना माहिती दिली. त्यांनी तात्काळ रविंद्र पवार, अभिलाषा मनोरे, अनिल कांबळे, सलिम पिंजारी, रविंद्र पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने सलग 900 किमीचा प्रवास करीत संशयित आरोपी उज्वला उर्फ संगिता उर्फ उज्जी अनिल गाढे हीला प्रियकरासोबत राहत असतांना सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास अटक केली.

फरार नववधूस पोलीस कोठडी

याप्रकरणात पूर्वी अटकेत असलेल्या लिलाबाई उर्फ भाभी व संगिताबाई उर्फ उज्वलाबाई या गेल्या 7 सप्टेंबर पासून न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान फरार नववधू विवाहीता उज्वला गाढे (वय-25, मूळ रा. विवरा ता. रावेर. ह. मू. भिलवाडा ता. मुक्ताईनगर) हीला शनीपेठ पोलिसांनी अटक केली. तीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.