जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील कोल्हे नगर परिसरातील वर्धमान हाईटस येथील प्राजक्ता बळीराम पाटील (वय-30) रा. वर्धमान हाईट्स, कोल्हे नगर या महिलेला एकाने शिवीगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.

प्राजक्ता पाटील ह्या डान्स ट्रेनर म्हणून काम करतात. गेल्या दिवसांपासून त्यांचे आशिष दयाराम महाजन (वय-45) रा. बडोदा, गुजरात यांच्या कौटुंबिक वाद होते.

दरम्यान, 15 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास आशिष महाजन हा कोल्हे नगर येथे घरी आला.व प्राजक्ता यांना शिवीगाळ करून लोखंडी दांड्याने मारहाण केली.

तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. यात महिलेचे मामा दिपक पाटील यांनी आवराआवर केली असता त्यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली.

प्राजक्ता पाटील यांनी रामानंदनगर पोलीसात धाव घेवून आशिष महाजन यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.