जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कत्तलीसाठी गायींची चोरी करणार्या संशयित आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. अद्याप दोन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

शहरातील मेहरुण परिसरातील पिरजादे मोहल्ल्यातील दारा इकबाल पिरजादे (वय 28) यांच्या शहरातील मेहरुण शिवारातील शेत शिवारातून गायींची चोरी झाल्याची घटना 27 सप्टेंबर रोजी घडली होती.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी शेख अजगर गुलाम कुरेशी (वय- 52, रा. कुंभावाडा, पाळधी ता. धरणगाव) याला 16 डिसेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास अटक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सैय्यद व सचिन पाटील यांच्या पथकाने अटक केली.

त्यांच्याकडून चोरी केलेली एक गाय हस्तगत करण्यात आली आहे. शेख अजगर गुलाम कुरेश हा सराईत गुन्हेगार असून त्याने शहरातसह चोपडा येथून देखील कत्तलीसाठी गायींची चोरी केल्याप्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे.

दोन जण फरार

कत्तलीसाठी चोरटे एमएच 1 बीटी 4255 क्रमांकाच्या कारने येत होते. चोरीसाठी वापरलेली कार व वसीम अहमद मोहम्मद असलम कुरेशी रा. मालेगाव व शेख मुजाहिद शेख जबीर कुरेशी रा. मासूमवाडी हे दोघजण अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.