वेषांतर करून करत होते मायलेक फसवणूक

नोकरीच्या आमिषाने 29 लाखांत फसवणूक प्रकरण : आणखी एक संशयित निष्पन्न
वेषांतर करून करत होते मायलेक फसवणूक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बँकेत नोकरीच्या आमिषाने पाच जणांची 29 लाखात फसवणूक केल्याच्या घटनेत संपूर्ण कुटुंबच सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत.

मायलेकासह तिघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहेत. यात आता अटक केलेल्या संशयित अंकितचा मोठा भाऊ हर्षवर्धन गोवर्धन भालेराव वय 38 याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहेत.

तो मात्र फरार असून पोलीस त्याचाही शोध घेत आहे. भविष्यात आपली ओळख समोर येवू नये संशयितांनी डोक्याला वीग वापरण्यासह वेशभूषा बदलावून तरुणांची फसवणूक केली असल्याचेही चौकशीत समोर आले असल्याचे तपासअधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक बिरारी यांनी बोलतांना सांगितले.

अंकितच्या पोलीस कोठडीत वाढ, आईसह बहिणीची कारागृहात रवानगी

बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जळगाव शहरातील दोघांसह पुणे, मुंबई व भुसावळ अशा पाच जणांची 29 लाख 80 हजार रुपयांत बनावट नावांच्या आधारे फसवणूक करणार्‍या अंकित गोवर्धन भालेराव (वय 28,), त्याची आई रत्नमाला गोवर्धन भालेराव (वय 62), व बहिण स्वाती गोवर्धन भालेराव (वय 30) (तिघे रा. रा. बौध्दवाडा मुक्ताईनगर) या तिघांना रामानंदनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिघा संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयित अंकीत भालेराव याच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ केली असून दोघा महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक बिरारी हे करीत आहेत.

फरार हर्षवर्धनच गुन्ह्याचा मास्टर माईंड

तपासअधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक बिरारी यांनी गुन्ह्यात संशयितांची कार तसेच मुक्ताईनगर येथे संशयितांच्या घराची घरझडती घेवून 1 लाख 76 हजारांच्या दागिण्यांसह 4 हजारांची रोकडही हस्तगत केली आहे.

पोलिसांच्या चौकशीत अटकेतील संशयित अंकीत याचा मोठा भाऊ हर्षवर्धन गोवर्धन भालेराव याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहेत. तसेच हर्षवर्धन हाच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र भाऊ, बहिण तसेच आईला अटक झाल्यानंत हर्षवर्धन हा फरार झाला आहे.

दिपक बिरारी यांच्यासह पथकाने नाशिक येथे जावून हर्षवर्धन याचा शोध घेतला. मात्र मिळून आलेला नाही. त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथकही रवाना करण्यात आले असून शोध सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com