बकरीईदच्या कुर्बानीसाठी गोर्‍ह्याची चोरी करणार्‍यास अटक

एमआयडीसीसह शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बकरीईदच्या कुर्बानीसाठी गोर्‍ह्याची चोरी करणार्‍यास अटक
चोरी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी गोर्‍हा चोरुन आणणार्‍या इसमाला शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून 10 हजार रुपये किंमतीचा गोर्‍हा जप्त केला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर एमआयडीसी पोलिसांनी कत्तलीसाठी बांधलेले तीन गोर्‍हे जप्त करीत उडाउडवीची उत्तरे देणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार, उमेश भांडारकर, विजय निकुंभ, रेश्मा मालवणकर यांचे पथक शाहू नगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते.

याचवेळी इंदिरानगरमध्ये एक इसम गोर्‍हा घेवून येत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला थांबविले असता त्या इसमाने त्याच्या हातातील गोर्‍ह्याचा दोर रस्त्यावरील खांबाला बांधून तो पळून जात होता.

याचवेळी पोलिसांनी त्याला पकडून त्याची विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव अजमदखान हसनखान (वय 43) रा. नूराणी मशीद मागे शाहूनगर असे सांगितले. तसेच त्याला हा गोर्‍हा कुठून व कशासाठी आणला याबाबत विचारले असता, त्याने उडाउडवीची उत्तरे देत हा गोर्‍हा बकरीईदच्या कुर्बानीसाठी आणला असल्याचे सांगत त्याच्याकडे कुठलीही खरेदी विक्रीची पावती नव्हती.

त्यामुळे हा गोर्‍हा चोरीचा असल्याची पोलिसांना खात्री झाली. याप्रकरणी उमेश भांडारकर यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -

सुप्रीम कॉलनीतून एक तर आक्सानगरातून दोन बैल जप्त

एमआयडीसी पोलिस आपल्या ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना आक्सा नगरात मोकळ्या जागेत दोन बैल बांधलेले दिसून आले. त्यांनी याबाबत विचापूस केली असता ते 20 हजार रुपये किंमतीचे दोन बैल आरीफ शहा लतीफ शहा (वय 40) रा. आक्सा नगर याचे असल्याचे समजले.

तर दुसर्‍या घटनेत सुप्रिम कॉलनीतील शोएब शेख कदीर शेख (वय 29) याने विक्री करण्याच्या उद्देशाने 10 हजार रुपये किमतीचा बैल आणला असून त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याप्रकरणी दोघांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com