अट्टल चोरट्यांची टोळी जेरबंद

अट्टल चोरट्यांची टोळी जेरबंद

सात मोटारसायकल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखची कामगिरी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मोटारसायकलची चोरी करुन त्याची कमी किंमतीत विक्री करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सात मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील हिंम्मत पाटील हा जळगावसह, धूळे, नाशिक येथून मोटारसायकली चोरुन त्या आपल्या गावात कमी किंमतीत विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक तयार करीत रवाना केले.

त्यानुसार आडगाव येथे सापळा रचून हेमंत उर्फ हिम्मत पाटील (वय 26) याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडील मोटारसायकल चाळीसगाव येथील असल्याचे सांगितले. तसेच तपासात त्याने आपल्या सोबत चोरीची गाडी विक्री करणारा बाळकृष्ण उर्फ रोहीत संभाजी पाटील (वय 29) रा. आडगाव व जगदिश बाळू शेळके रा. पथराड ता. भडगाव यांना अटक केली. जगदिश शेळके हा देखील गाडी चोरी करीत त्याची विक्री करीत होता सध्या तो मोटारसायकल चोरी व आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यात पुणे येथील भोसरी पोलीसांच्या ताब्यात आहे.

या पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगावान पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील, दीपक चौधरी, भारत पाटील यांच्या पथकाने केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com